
HSC Exam:राज्यभरात बारावीच्या परीक्षा,निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10मिनिटं वेळ वाढवून मिळणार
Continues below advertisement
HSC Exam : राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षा, निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून मिळणार
राज्यात बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार आहे. तसंच परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी अडीचपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असणं बंधनकारक आहे.
Continues below advertisement