ST Strike : एसटी आंदोलनाची आजची स्थिती काय? किती कामगारांनी घेतले संप मागे?

Continues below advertisement

वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल तर दिलेली पगारवाढ रद्द करण्याचा इशारा अनिल परब यांनी दिलाय. मात्र या इशाऱ्यानंतरही एसटीचा संप अनेक ठिकाणी सुरूच आहे. दुसरीकडे दोन दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर एसटी महामंडळाने पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. याशिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेलं आहे. जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या जागी २०१९च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना कामावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram