Hospital Accidents | रुग्णालयात दुर्घटनांचं सत्र सुरुच, चार महिन्यांतील घटनांनी महाराष्ट्र सुन्न

Continues below advertisement

महाराष्ट्र नाशिकच्या दुर्घटनेतून सावरत नाही तेवढ्यात आज विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास विरारमधील कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं असून रुग्णालयातील इतर रुग्णांना स्थलांतरीत केलं जात आहे. दरम्यान, नाशिक आणि विरार येथे घडलेल्या घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलेल्या नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून रुग्णालय व्यवस्थेच्या चुकीमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू, तर भांडुप मधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी नागपुरातील कोविड सेंटरलाही भीषण आग लागली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram