Sambhajinagar Shocking Video: विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून मारहाण, संभाजीनगरमधील धक्कादायक व्हिडिओ
Continues below advertisement
राज्यातील मूकबधिर निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेतील शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसार, 'एका व्हिडिओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत आहेत, तर दुसऱ्या एका व्हिडिओत कुकरने मारहाण केली जात आहे'. ही घटना अत्यंत निंदनीय असून, ज्यांना आपल्या वेदना आणि दुःख शब्दात मांडता येत नाही, अशा चिमुकल्यांना क्रूरपणे मारहाण केली जात आहे. एक व्हिडिओ २०१८ मधील असल्याचे म्हटले जात आहे, तर काही सीसीटीव्ही फुटेज दोन महिन्यांपूर्वीचे आहेत. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement