Dilip Walse Patil PC | प्रशासकिय कामात हस्तक्षेप करणार नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Continues below advertisement

मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकरला. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कठीण काळात गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलीस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील. तसेच प्रशासकीय कामात माझ्याकडून हस्तक्षेप होणार नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. 

एकीकडे कोरोनाचं संकट असताना याच महिन्यात गुढी पाडवा आहे, रमजान आहे, महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा असतात. कोरोनाचा अंदाज पहिला तर या महिन्यातील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे.  गृह विभागाकडून महिलांनाही मोठ्या अपेक्षा असतात. त्या देखील पूर्ण करण्याचा पोलीस दलाकडून प्रयत्न केला जाईल, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram