Palghar mob lynching | Anil Deshmukh | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे, घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद

पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात 101 जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, घटनेनंतर गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तिथून त्यांना ताब्यात घेतलं. त्या 101 जणांची यादी आज जाहीर करणार आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola