कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या 'या' अठरा जिल्ह्यांत गृह विलगीकरणास बंदी : आरोग्यमंत्री

मुंबई : आज माध्यमांशी बोलताना राज्यातील आरोग्य यंत्रणेच्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारनं लसीच्या आयातीसाठी धोरण ठरवावं, असं आरोग्यमंत्री बोलताना म्हणाले. त्याचप्रमाणे आशा वर्कर्सना यापुढे कोरोना चाचणी करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील म्युकर मायकोसिस (Mucormycosis)च्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सरकारकडून या आजाराबाबत उपाययोजनांची चर्चा करण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola