Holi Preparation Mumbai : होळी, धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांकडून गाईडलाईन्स जारी
abp majha web team
Updated at:
21 Mar 2024 08:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHoli Preparation Mumbai : होळी, धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांकडून गाईडलाईन्स जारी
होळी आणि धुलिवंदनाचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत होळी आणि धुलिवंदनाची तयारी सुरु झालीय. बाजारपेठांमधून होळीचे रंग आणि साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोन दिवसांच्या सणात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. तसंच धुलिवंदनाच्या दिवशी असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय. पाहूयात पोलिसांनी कुठल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.