ABP News

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट

Continues below advertisement

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट

शहरातील हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आलं आहे. त्यामुळे, टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय, अशा अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत होते. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे (Pune) शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल (बुधवारी, ता-20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. सुदैवाने 10 प्रवासी बचावले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram