Hingoli Turmeric: हळदीला 11 हजार रुपायांचा उच्चांकी भाव ABP Majha

Continues below advertisement

हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते.वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आज झालेल्या हळदीच्या विक्रीत उच्चांकी ११ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.तर काल हिंगोलीच्या मार्केट यार्डात 7800 तेसव्वा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळाला. सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर मिळत आहे. मात्र, या वर्षी हळदीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव व पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. मराठवाड्यासह विदर्भातून यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातून हिंगोलीच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला येते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram