Hingoli Rains | हिंगोलीत रात्री मुसळधार, सकाळी संततधार; पीक लागवडीला प्रारंभ
दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री अकरा वाजतापासून हिंगोली जिल्ह्यात सर्व दूर पाऊस सुरु आहे. काल हळद, कपाशी, सोयाबीन, झेंडूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आज दिवसभर झडीच्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरु आहे.