Quarantine Couple Tortured | शेतात क्वॉरंटाईन असलेल्या गर्भवती महिलेसह पतीला मारहाण

वसमतमधील हट्टा येथे मुंबई येथून आपल्या गावी परतलेले काही कुटुंब आपल्या स्वतःच्या शेतामध्ये क्वारंटाईन म्हणून राहत होते. यातील दोघे जण रस्त्यावर येऊन बसल्याने त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या दोन ग्रामस्थांनी 'शेतात जाऊन बसा, तुम्ही असे कसे फिरत आहेत' असे म्हणून पुढे निघून गेले होते. यावेळी त्यांना या शेतात थांबलेल्या ग्रामस्थांनी अडवून मारहाण केली. त्यामुळे त्या दोघांनी गावात येऊन ही बाब ग्रामस्थांना सांगितल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी शेतात धाव घेऊन शेतात थांबलेल्या त्या कुटुंबाला मारहाण केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola