Hingoli : रस्त्यावरील खड्ड्याने जवानाचा जीव घेतला? ABP Majha
रस्त्यावरील खड्ड्यानं एका जवानाचा जीव घेतला का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण चारचाकी गाडी खड्ड्यात आदळताच रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा मृत्यू झाल्याची हिंगोलीत चर्चा रंगलीय. पप्पाला भानुप्रसाद असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. प्रशासकीय कामानिमित्त जवान आणि गाडीचालक हे दोघे डोंगरकडामार्गे नांदेडला निघाले होते... त्या महामार्गाचं सध्या चौपदरीकरण सुरु आहे. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूची वाहतूक एकाच बाजूनं सुरु आहे. बाळापूर ते नांदेड रोडवर ही घटना घडलीय. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.