Hingoli New Balbharati Workbook : शाळकरी विद्यार्थ्यांच्या नव्या वहीची झलक फक्त EXCLUSIVE 'एबीपी माझा'वर
Continues below advertisement
नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. या वहीची पहिली झलक तुम्हाला केवळ एबीपी माझावर पाहायला मिळतेय.. पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारतीने ही नवी कोरी पुस्तक तयार केली आहेत. पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडे, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात, त्यासाठी पुस्तकांना वह्यांची पानं जोडली गेली आहेत. 'माझी नोंद' या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर विद्यार्थ्यांना लिहिता येणार आहे. विद्यार्थ्यांना आता आपल्या दप्तरांमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही. जे शिक्षक शिकवतील त्याच्या नोंदी आता याच पुस्काला जोडलेल्या पानांवर करायच्या आहेत
Continues below advertisement