Hingoli Lok Sabha Election : शिदेंची शिवसेना जाहीर केलेल्यांपैकी उमेदवार बदलण्याची शक्यता

Continues below advertisement

Hingoli Lok Sabha Election : शिदेंची शिवसेना जाहीर केलेल्यांपैकी उमेदवार बदलण्याची शक्यता
हिंगोली लोकसभेसाठी  महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, हेमंत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे...तर सेनेकडून घोषित केलेल्या आठ जागा पैकी एखादा उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातून म्हणजेच हिंगोली किंवा हातकणंगले किंवा दोन्ही जागांवरील  उमेदवार बदलला जाण्याची शक्यता असल्याची संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram