Hingoli : हिंगोलीत हळदीच्या कुकरचा स्फोट, 4 जण जखमी ABP Majha

Continues below advertisement

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील काहाकर बुद्रुक येथे हळद शिजविण्याचे काम सुरू असताना काम करणाऱ्या मजूर सोबत धक्कादायक घटना घडली आहे. कुकरचां स्पोट होऊन एकुण चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. एक जनावर नादेड, दोघे अकोला, तर एक जनावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगावर गरम पाणी पडल्याने  चौघे जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. काम करत असताना जेवणाचा ब्रेक घेतल्यानंतर जेवण सुरू असतानाच हा सर्व प्रकार घडला. सदरील कुकरचे शिटी लॉक झाल्यामुळे स्पोट झाल्याची प्राथमिक माहिती गावकरी यांनी दिली आहे.संदीप श्रीराम पोपलघट यांचे हे हळद शिजविण्याचे यंत्र असुन देवराव प्रभाकर पोपळघट यांच्या शेतात ही घटना घडली. सर्व जखमींना रात्रीच रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पूर्वी हळद शिजविण्यासाठी शेतकरी कढई चा वापर करत असत मात्र आता नवनवीन शोध लागल्यामुळे कुकर देखील उदयास आले आहे. यासाठी अधिक शेतकरी पसंती देत आहेत. परंतु ही वस्तू सुरक्षित रित्या हाताळली न गेल्यास जीवावर बेतू शकते. हे नुकतेच काहाकर येथे घडलेल्या घटनेतून समोर आले. यापैकी दोघांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती गावकर यांनी दिली आहे. जखमिंची नावे मात्र अद्याप तरी कळू शकली नाही. ईतरही शेतकऱ्यांनी हळद शीजवण्याचे काम सुरु असताना काळजी घेण्याचे आवाहन, कृषी विभाग व प्रशासनाने केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram