Hingoli | शेतकऱ्यांनी पीकविम्याची तुटपुंजी रक्कम मुख्यमंत्र्यांना पाठवली
Continues below advertisement
यंदा कोरोना काळात एकीकडे कंबरडे मोडले असताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरुनही त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. काही ठिकाणी मदत मिळाली तर ती अत्यंत तोकडी. यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी तुटपुंजी रक्कम शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पीक विमा कंपन्यांच्या विरोधात हजारो तक्रार अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या 124 टक्के पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील सोयाबीन तूर उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झालं होतं. जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही त्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. काही शेतकऱ्यांना मिळाली मात्र ती रक्कम तुटपुंजी मिळाली. त्यामुळे हिंगोलीच्या डोगरकडा गावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची मिळालेली अठराशे रुपयाची रक्कम ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने चेकद्वारे पाठवली आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये आंदोलन केले आहे. महत्वाचे म्हणजे या शेतकऱ्यांनी 900 रुपये हेक्टरी पीक विमा भरला होता आणि 200 रुपये ऑनलाईन भरण्याचे असे 1100 रुपये भरून केवळ 1800 रुपये पीक विमा परतावा या शेतकऱ्यांना मिळाल्याने या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.