Hingoli Crime : जुन्या वादातून दोन गटांत भांडण, अनेक गाड्या आणि दुकानांची तोडफोड ABP Majha
Continues below advertisement
हिंगोली शहरात रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. जुन्या वादातून दोन गटांत भांडण झालं आणि त्यानंतर अनेक गाड्या आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केलेत.
Continues below advertisement