Diwali 2021 : दिवाळीत फटाक्यांपासून सावधान, हिंगोलीत नऊ वर्षीय मुलानं फटाके फोडताना गमवावा डोळा
abp majha web team
Updated at:
30 Oct 2021 02:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळी काही दिवसांवर आली असून आपण मुलांसाठी फटाके देखील खरेदी केले असतील. मात्र मुलांच्या हातात फटाके देण्यापू्र्वी ही बातमी आवर्जून पाहा. फटाके फोडताना हिंगोलीतल्या एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे. साईनाथ घुगे असं डोळा गमवावा लागलेल्या मुलाचं नाव आहे. हिंगोलीतल्या गोजेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या जखमी साईनाथवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळं एबीपी माझा सर्वांना आवाहन करत आहे की मुलांना फटाके फोडण्यासाठी एकटं सोडू नका आणि पालकांनी त्यांच्यासोबत आवर्जून रहावं.