Hinganghat: पिडीत शिक्षिकेला 2 वर्षांनंतर न्याय, जळीतकांड प्रकरणी प्रकरणी नराधम दोषी ABP Majha
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आज न्यायालयानं निकाल जाहीर केला. आरोपी विकेश नगराळे यालाच पीडितेच्या हत्येसाठी न्यायालयानं दोषी मानलं आहे. ३ फेब्रुवारी २०२० मध्ये दोषी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून पीडितेला पेटवून दिलं होतं. उपचारादरम्यान १० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला होता.. पीडितेच्या मृत्यूनंतर तब्बल २ वर्षांनी तिला न्याय मिळालाय. या प्रकरणात उद्या दोषीच्या शिक्षेसाठी युक्तिवाद होणार असून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार अशल्याचं वकिलांनी सांगितलंय. या निकालावर पीडितेच्या पालकांनीही समाधान व्यक्त केलंय.
Tags :
Hinganghat Death Court Punishment Verdict Argument Guilty One-sided Love One-sided Love Accused Vikesh Nagarale Arson Case