Hinganghat: हिंगणघाट जळीतकांड, नराधम विकेश नगराळे दोषी ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Feb 2022 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आज न्यायालयानं निकाल जाहीर केला. आरोपी विकेश नगराळे यालाच पीडितेच्या हत्येसाठी न्यायालयानं दोषी मानलं आहे. ३ फेब्रुवारी २०२० मध्ये दोषी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून पीडितेला पेटवून दिलं होतं. उपचारादरम्यान १० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला होता.. पीडितेच्या मृत्यूनंतर तब्बल २ वर्षांनी तिला न्याय मिळालाय. या प्रकरणात उद्या दोषीच्या शिक्षेसाठी युक्तिवाद होणार असून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार अशल्याचं वकिलांनी सांगितलंय. या निकालावर पीडितेच्या पालकांनीही समाधान व्यक्त केलंय.