Hinganghat Crime: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. ३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट इथं आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारी २०२० रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल ४२६  पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत २९ साक्षीदार तपासण्यात आलेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आज निकाल येण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram