Hinganghat | हिंगणघाट जळीत कांडाच्या आरोपीला न्यायालयीन कोठडी | ABP Majha

आरोपी विकेश नगराळेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणी राज्यभरातील नागरिकांच्या मनात तीव्र संताप आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आरोपीची ५ दिवसांची पोलिस कोठडी आज संपतेय. त्यामुळं आज कोर्टात पोलिस पुन्हा एकदा आरोपीची कोठडी मागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपीनं पोलिस कोठडीत असताना आपल्या मुलीला आणि बायकोला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय. जळीतकांडाच्या 12 दिवसांपूर्वीच विकेशला मुलगी झाली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola