Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना हायकोर्टाचा दिलासा नाही, ईडीचा समन्स रद्द करणारी मागणी फेटाळली
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने आज निर्णय दिला आहे. ईडीनं पाठवलेले समन्स रद्द करण्यासाठी देशमुखांनी ही याचिका दाखल केली हाती. 13 ऑक्टोबरला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं यावरील आपला निर्णय राखून ठेवला होता. मात्र आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांची मागणी फेटाळली आहे.
Tags :
ED Anil Deshmukh Anil Deshmukh Ed Anil Deshmukhe Court Case Anil Deshmukh Cases Anil Deshmukh Scam Anil Deshmukh Highcourt