Ahmednagar : खोदकामादरम्यान सापडलं 8 लाखांचं गुप्तधन, कामागारांना ठरलेले पैसे न दिल्याने भांडाफोड
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या हंड्यातील गुप्त धनात चांदीची ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १०२० नाणी असे सापडलेलेले सुमारे ८ लाख रुपये किमतीचे गुप्तधन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहे.