Hement Godse Lok Sabha Election 2024 :नाशिकची पारंपरिक जागा शिवसेनेची,आपल्यालाच मिळणार : हेमंत गोडसे
Continues below advertisement
नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा होत नसल्याने कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे, त्याच अस्वस्थतेतून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान गाठून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नाशिक लोकसभेसाठी भाजपमधून इच्छुक उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुबंई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडूनही चाचपणी सुरु झाल्याने शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत दबाव टाकला. नाशिकची पारंपरिक जागा शिवसेनेची आहे, ती आपल्यालाच मिळणार असा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी....
Continues below advertisement