Hemat Kshirsagar Join BJP : संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर
Continues below advertisement
बीडच्या राजकारणात क्षीरसागर बंधूंमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. हेमंत क्षीरसागर यांनी 'विकासाचा दृष्टीकोण ठेवून भाजपसोबत जात आहे' असे एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या चाळीस वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाकडे असलेली नगरपालिकेची सत्ता आणि आता भावा-भावामधील राजकीय संघर्ष यामुळे बीडमधील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याच्या नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकास होऊ शकतो, असेही हेमंत यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी काळात संदीप क्षीरसागर यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement