Sudhakar Badgujar : खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात ? सुधाकर बडगुजर यांच्या गौप्यस्फोट
Sudhakar Badgujar : खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात ? सुधाकर बडगुजर यांच्या गौप्यस्फोट एकीकडे खासदार हेमंत गोडसे हे वर्षा निवासस्थानावर सातत्याने येत आहेत. तर दुसरीकडे हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कातही असल्याची चर्चा रंगलीय. त्यासाठी कारण ठरलं ते ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट...सिन्नरमध्ये ठाकरे गटाचा संवाद मेळावा झाला. त्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय. गोडसेंची तीन माणसं आपल्याकडे आली आणि पदरात घ्या म्हणाली असा दावा त्यांनी केलाय. महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच बडगुजर यांचं वक्तव्य चर्चेत आलंय.