Heavy Rains | Satara रेड अलर्ट, कृष्णा नदीच्या वेढ्यात Wai Mahaganpati मंदिर!

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धोम धरणातून मध्यरात्री ८ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आला. याचा परिणाम म्हणून वाई येथील प्रसिद्ध महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. गणपतीच्या पायांपर्यंत पाणी पोहोचले आहे. कृष्णा नदीचे पाणी गणपतीच्या चरणांना स्पर्श करत असल्याचे चित्र दिसत आहे. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. गेल्या २४ तासांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी ड्रोन कॅमेऱ्याने ही दृश्ये टिपली आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola