कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ! 17 मे रोजी मुंबई,ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
Tags :
Cyclone Weather Update Sindhudurg Heavy Rains Meteorological Department Maharashtra Weather Maharashtra Weather Update