Mumbai Rains | Vasai-Virar मध्ये संततधार, सखल भागात पाणी; विद्यार्थ्यांचे हाल, 17 सप्टेंबरपर्यंत इशारा
वसई-विरार परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. आजही सकाळी पावसाची रिपरिप सुरू असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सततच्या पावसामुळे परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा फटका सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. हवामान खात्याने १७ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वसई-विरार शहरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि सकाळीही पावसाने आपली इनिंग्ज सुरूच ठेवलेली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. गाल्हानगर हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत, त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.