Heavy Rain | पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी भरण्याची शक्यता

Continues below advertisement
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रूज आणि वांद्रे या सर्व परिसरांमध्ये मागील अर्ध्या ते एक तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर सखल भागांमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगावजवळ रस्त्यावर Visibility कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम उपनगरात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचलेले दिसत आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola