Heavy Rain | बीडमध्ये दमदार पाऊस, Godavari रौद्र रूपात, NathSagar मधून विसर्ग
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दमदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने रौद्र रूप (Fierce Form) धारण केले आहे. नाथसागरातूनही (Nathsagar) पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरू असून, नदी क्षेत्रात सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी (Water Level) वाढली आहे. दुष्काळी बीड जिल्ह्यासाठी ही समाधानकारक दृष्ये आहेत. ड्रोनच्या माध्यमातून प्रतिनिधी विकास माने (Vikas Mane) यांनी गोदावरी नदीचे रौद्र रूप दाखवले. विकास माने यांनी गोदावरी नदीपात्रात उभे राहून जालना जिल्ह्याची हद्द असलेल्या शहागड (Shahagad) आणि बीड जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्याच्या हद्दीतील दृश्ये दाखवली. नाथसागरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आणि सततच्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदी खळखळून वाहत आहे. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना (Farmers) आणि स्थानिकांना (Locals) होत आहे.