Heavy Rain | परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी,अस्मानी संकटामुळे बळीराजाचं कंबरडं मोडलं
Continues below advertisement
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय. तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाताली काही जिल्ह्यामध्ये आज पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement