Heavy Rain Crop Damage | छत्रपती Sambhaji Nagar मध्ये मुसळधार पाऊस, ऊस शेतीचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः पैठण तालुक्यातील नाटकरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ऊसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, ज्यामुळे ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. वडजी गावातील शेतकऱ्यांचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वडजी गावात तीन एकर ऊस पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना तातडीने मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने या नुकसानीची त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola