State Heat Wave : विदर्भातील 4 जिल्ह्यांत उष्णतेची लाट, दुपारी घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन
Continues below advertisement
चार दिवसांपासून सूर्य आग ओकतोय आणि हे कमी की काय विदर्भातील नागपूर, अकोला, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी नागपूर वेधशाळेनं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. दुपारी गरम वारे वाहत असल्याने लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेष म्हणजे काल अकोल्याचं तापमान ४५.५ अंश, वर्धा ४४.६ अंश, नागपूरचा पारा ४२.७ अंश आणि चंद्रपूरचं तापमान ४२.४ अंशांवर गेलं होतं. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, आणि दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनानं केलंय..पाहूयात वरुणराजाच्या अवकृपेनंतर सूर्यदेवाचा कसा कोप झालाय....
Continues below advertisement
Tags :
Yavatmal Akola Vidarbha Wardha Nagpur Be Careful Four Days Surya Aag Heat Wave Warning Hot Winds