Mosque Loud Speaker : संतोष पाचलग यांच्या भोंग्यांविरोधी याचिकेवर 14 जुन रोजी सुनावणी

Continues below advertisement

मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे संतोष पाचलग यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. त्यांनी केलेल्या याचिकेतील सर्व बारकावे आणि अतिरिक्त माहिती ते राज ठाकरेंना देणार आहेत. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्यासमवेत पाचलग राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत. मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात 2014 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर उच्च न्यायालयानं सर्वच धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरकारनं काय कारवाई केली याची माहिती पाचलग यांनी 2018 साली आरटीआय अंतर्गत मागवली होती. त्यात मशिद, मंदिर, चर्च, गुरुद्वारा आणि बुद्धविहार अशा धार्मिक स्थळांवर अवैध लाऊडस्पीकर असल्याची माहिती समोर आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram