NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? उद्यापासून महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगात पार पडणार

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यासंदर्भात उद्यापासून महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगात पार पडणार आहे..  उद्या दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार असून यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र सह देशाचे लक्ष लागलं आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप गेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने केला होता..तर पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप केला..पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी उद्या शरद पवार दिल्लीला जाणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram