Local Body Polls: स्थानिक स्वराज्य निवडणुका हायकोर्टाच्या रडारवर, २८ याचिकांवर सुनावणी
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात (Local Body Elections) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल झालेल्या तब्बल २८ याचिकांवर एकत्रित सुनावणी होत आहे. मतदार यादीशी संबंधित याचिकाकर्त्यांनी 'संपूर्ण तयारीनिशी युक्तिवाद करण्याच्या' सूचना मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने दिल्या आहेत. या याचिकांमध्ये मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement