ज्यांची नोंदणी होईल त्यांनीच लसीकरण केंद्रावर जावं, साठा कमी असल्याने काहीच केंद्र सुरू असणार - टोपे
Continues below advertisement
देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. बुधवारी अवघ्या तीन तासांमध्ये जवळपास 80 लाख लोकांनी या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती मिळाली आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination Health Minister Rajesh Tope COVID Vaccine SERUM Covid Vaccnation