Rajesh Tope : नव्या वर्षात Lockdown चं संकट अटळ? जनतेचे प्रश्न, आरोग्यमंत्र्यांची उत्तरं
Rajesh Tope : सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दरम्यान, आज राज्यात 12 ते 15 हजार कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या रोखणे त्याचबरोबर निर्बंधांचे पालन करणे हे राज्य सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे टोपे यावेळी म्हणाले. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कडक निर्बंध लावण्याचे संकेत देखील टोपे यांनी दिले आहेत.