ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 25 May 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 25 May 2024

राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं...मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण...नद्या कोरड्याठाक...

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवालला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी...ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप 

डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही..स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या दहावर

२०१६मध्ये डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीतील स्फोटाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती, केमिकल कंपन्या आणि बफर झोन कसा असावा, हे अहवालात नमूद.

बीडमधील परळीमध्ये लोकसभा मतदानावेळी बूथ कॅप्चरिंग झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप, तर  निवडणुकीत पराभव दिसत असल्याने बूथ कॅप्चरिंगचा आरोप, सुनील तटकरेंचा पलटवार.

मी लंडनला जाऊ शकत नाही, मला मुख्यमंत्री केल्यानं राज्यात काम करावंच लागतं, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...तर ठाकरे लंडनचे नाले बघायला गेलेत का, आशिष शेलारांचा हल्लाबोल...

मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना संधी...कोकण पदवीधरसाठी महायुतीकडून निरंजन डावखरे तर मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांच्या नावाची चर्चा

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram