ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 3 June 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 3 June 2024 : Maharashtra News
मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांचाच विरोध...गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचं कारण...परवानगी देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
२० मे रोजी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याबाबत उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश, कोण कुणावर कारवाई करणार ते उद्या दुपारपर्यंत कळेल, संजय राऊतांचा पलटवार
निकालानंतर मोदींसोबत जाण्याबद्दल उध्दव ठाकरेंच्या कुटुंबाचं एकमत झालंय, रवी राणा यांचा खळबळजनक दावा...
छगन भुजबळ महायुतीमध्ये की मविआसोबत ते उद्या संध्याकाळी सांगतो, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य
भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे विरूद्ध अभिजीत पानसे तर मुंबई पदवीधरमधून किरण शेलार विरूद्ध अनिल परब, महायुतीत कोकण पदवीधरवरून तीन तिघाडा
मार्केटमध्ये जेवढ्या जल्लोषाच्या गोष्टी आहेत तेवढ्या आम्ही विकत घेतल्यात...नारायण राणेंच्या विजयाबद्दल निलेश राणेंना खात्री...
काही जागांवर उमेदवार न बदलल्याने जागा कमी होताना दिसतायत, गिरीश महाजनांची मोठी कबुली