ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 5 August 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 5 August 2024 : Maharashtra News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election) 2024 साठी मनसेने (MNS) दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज सोलापूर (Solapur News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदावादी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे  अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत. 

मनसेच्या प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलंय?

मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा - नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मा.राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram