ABP Majha Headlines : 12 PM : 15 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

इलेक्टोरल बॉण्डस स्कीम घटनाबाह्य, माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने योजना फेटाळली

काँग्रेस आमदारांच्या बैठकीला सुरुवात, बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेस आमदारांना व्हीप, तर आमदाराच्या उपस्थितीकडे लक्ष

महायुतीचे सर्व पाच उमेदवार एकत्र राज्यसभेसाठी अर्ज भरणार, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती तर मविआचे चंद्रकांत हंडोरेही अर्ज दाखल करणार 

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, प्रकृती खालावली, नारायण गड महंतांच्या विनंतीवरुन सलाईन

मनोज जरांगे औषधोपचार घेणार आहात की नाही, हायकोर्टाकडून जरांगेंना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, सदावर्तेंच्या याचिकेवर हायकोर्टाकडून विचारणा

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा आज निकाल, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लक्ष

मुंबईला पाणीपुरवणाऱ्या सातही तलावात पाणी टंचाई, राखीव पाण्यासाठी महापालिकेचं राज्य सरकारला पत्र, राखीव पाणीसाठा न मिळाल्यास १० टक्के पाणीकपात

प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध, सक्ती केल्यास स्कूलबसचे भाडे २५ ते ४० टक्क्यांनी वाढवण्याचा इशारा

शेतकरी आणि सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा,संध्याकाळी चंदीगडमध्ये तिसरी बैठक तर शंभू सीमेवर आंदोलक शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत

शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांचा ठिय्या, आज पंजाबमध्ये रेल रोको करण्याच्या तयारीत, पुन्हा दिल्लीच्या दिशेनं कूच

राज्यातील एक लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांचा गरिबांच्या धान्यावर डल्ला, आधार कार्ड रेशन कार्डला लिंक केल्यामुळे घोटाळा उघडकीस

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram