ABP News

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 June 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 June 2024

मविआने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावा, संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल तर निवडणूक लढता येणार नाही, राऊतांचं वक्तव्य.

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा प्रश्न चर्चेनं सोडवू, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, तर ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, सर्वसामान्यांच्या हितासाठी, रोहित पवारांचं विधान.

भाजपच्या आठवी पास माजी आमदाराचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान, शाईचं बोट दाखवून फोटो प्रसिद्ध केले, पण आता म्हणतात मतदान केलं नाही...

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य सरकारच्या हालचाली, हायकोर्टात ४ जुलैला सुनावणी, स्थगिती उठणार का याची उत्सुकता 

आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधन, सरकारच्या पुढील पाच वर्षांचा रोडमॅप मांडणार

शिकार करा आणि भिंतीवर टांगा, राहुल गांधींचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना हसतखेळत इशारा, तर गटबाजी खपवून घेणार नाही, काँग्रेस अध्यक्षांची तंबी

नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात शालेय पोषण आहारात आढळला मृत पक्षी, पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करा, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांची मागणी 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram