Hasan Mushrif On Dr. Ajay Taware :तावरेंच्या निलंबनाची कारवाई अशा घटना पुढे घडू नये म्हणून : मुश्रीफ
ससून फेरफार प्रकरणात समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल आला. अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मी आधीच सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट आहे त्यावर कारवाई होईल. यापुढे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यात असं प्रकरण त्यांना करता येणार नाही अशा प्रकारचे शिक्षा किंवा कारवाई होईल. त्याप्रमाणे आपण कारवाई केली आहे. संपूर्ण चौकशी होईल त्यांचा सुद्धा मत घेतला जाईल. त्यांना योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. आणि दोघांना निलंबित केले आहे. 26 तारखेला ही घटना मला कळाली. त्याच वेळा मी सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणे ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे. लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. अशाप्रकारे घटना घडता कामा नये यासाठी मी निर्देश देखील दिले, असं मंत्री हसन मुश्रीफ याबाबत बोलताना म्हणाले.