Hasan Mushrif On Beedतोपर्यंत राजीनाम्याची आवश्यकता नाही,बीड प्रकरणी हसन मुश्रीफ म्हणाले

Continues below advertisement

Hasan Mushrif On Beedतोपर्यंत राजीनाम्याची आवश्यकता नाही,बीड प्रकरणी हसन मुश्रीफ म्हणाले

समाजाला घेऊन जाणारा आमचा संतोष देशमुख आज आमच्यामधून निघून गेला आहे. मात्र ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलं आहे तो वाल्मीक कराड याला घोडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मनसुख हिरेन प्रकरण शोधून काढलं. मग आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या घटनेकडे कुणाच्या दबावाखाली काम करत आहात? हे उत्तर तुम्ही देणं गरजेचं असल्याची टीका आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केली आहे. 

अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना हाकलून लावले पाहिजे- नरेंद्र पाटील

धनंजय मुंडे यांना जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाच्या पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना हाकलून लावले पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. माणुसकी म्हणून ज्या अजित पवारांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली त्याच अजित पवारांनी मंत्रिमंडळात मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देणे गरजेचं नव्हतं, मात्र ते झालं. संतोष देशमुख हा केवळ मराठा नसून बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीचा आहे. एवढंचं मला आज आवर्जून सांगायचं आहे. बीडमध्ये कुण्या एका जातीची हत्या झाली नसून ती संबंध माणुसकीची हत्या झाली आहे. माझी आज सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन आहे की या प्रकरणातील न्याय मिळेपर्यंत आपण शांत राहायचं नाही. या प्रकरणातला मुख्य आका कोण आहे हे आता शोधून काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram