Prashna Maharashtrache कंगनाव्यतिरिक्त महाराष्ट्रासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत - अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासासाठी केंद्राकडून सीबीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तो विषय मागे पडला आहे. सुशांतसिंह राजपूत हत्या की आत्महत्या या प्रकणाचा सखोल तपास व्हावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्रा'चे या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि कंगना वादावर प्रश्न विचारला असता अनिल देशमुख म्हणाले, या विषयावर चर्चा केली जावी एवढा मोठा विषय नाही. त्यामुळे या पेक्षा अनेक मोठे विषय आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे केला आहे, असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे असे काही मंडळीनी ठरवले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola