ABP News

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखत

Continues below advertisement

Harshvardhan Sapkal : महाराष्ट्रातली आजची सर्वात मोठी समस्या जर कुठली असेल तर तो माणसा- माणसात, समाजात, माणसांच्या मनामनात, जाती धर्मात जो द्वेष आणि अंतर पडत चाललं आहे ती मोठी समस्या आहे. त्यामुळे सद्भावना लयास गेली आहे की, तळाशी गेली आहे हे तपासावं लागत आहे. दुसरीकडे माणसं कुठल्याही दुकानात गेली असताना किंवा कुठला व्यवहार करत असताना आपल्या जातीच्या व्यक्ती बघू लागली आहे. तसेच कुठल्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलत असताना ती आपल्याच जातीचा व्यक्ती बोलवत असल्याचे चित्र उभं राहतंय. यावर बोलण्याचं तत्वपर्य काय तर जो, शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारकऱ्यांचा संत गाडगेबाबांच्या विचारांचा आणि महाराष्ट्र धर्म जो आपण मानतो त्याची घडी कुठेतरी विस्कळीत झाली असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आजची समाजाची विस्कटलेली ही घडी व्यवस्थित करत असताना कुठल्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे तर त्याचं उत्तर हे सद्भावना हे आहे. असे म्हणत  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुलाखत देत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. 

सध्या जी काही विधान केली जातं आहेत सद्भावना विरहित आहे. त्यामुळे आम्ही काढलेली सद्भावना यात्रा ही केवळ बीडसाठी नसून ती सबंध महाराष्ट्रासाठी होती. असेही हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले. त्यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातमुलाखत देत असताना राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram